महाराष्ट्रात वाढतोय शिवसेनेचा जनाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST2021-07-22T04:07:06+5:302021-07-22T04:07:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात शिवसेनेचा जनाधार वेगाने वाढत असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. ...

Shiv Sena's mass base is growing in Maharashtra | महाराष्ट्रात वाढतोय शिवसेनेचा जनाधार

महाराष्ट्रात वाढतोय शिवसेनेचा जनाधार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रात शिवसेनेचा जनाधार वेगाने वाढत असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. भविष्यात शिवसेनेला याचा निश्चितच लाभ पोहोचेल, असे मत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केले.

युवासेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. दुष्यंत चतुर्वेदी, अमेय घोले, रुपेश कदम, आदित्य शिरोडकर, धरम मिश्रा, सर्वेश गुरव, अभिमन्यु खोतकर उपस्थित होते. कोरोनाची एकूण स्थिती पाहता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या सेवेच्या कार्याला वेग द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, सचिव मुन्ना तिवारी, हितेश यादव, विक्रम राठोड़, संदीप पटेल, शशिकांत ठाकरे, धीरज फंदी, शशिधर तिवारी, अक्षय मेश्राम, राजे जयसिंग भोसले, नीलेश तिघरे, ऋषिकेश जाधव, आकाश पांडे, आशिष हाडगे, अब्बास अली, गौरव गुप्ता उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's mass base is growing in Maharashtra