शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 12:19 IST

नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता नागपूरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. विदर्भात सेना वाढवायची असेल तर नागपुरात पक्ष मजबूत करावा लागेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते नागपूर दौऱ्यावर असून महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेणार आहेत. विशेष  म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात गेल्या एक महिन्यातील राऊत यांचा हा दुसरा दौरा आहे.

नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. नागपुरात आमच्यासारखे लोक येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. आदित्य ठाकरेदेखील नागपूरचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील राज्याच्या आणि विदर्भातील पक्षकार्यात स्वत: लक्ष घालत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

२०२४ साली विधानसभेत मजबूतीनं उभं राहायचं असेल तर आम्हाला विदर्भात काम करणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यात नव्याने कार्य सुरू झाले आहे. याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. नागपुरात महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी शिवसेना तयारी करत आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.  

आयएनएस विक्रांतवरून कारवाईचा इशारा

आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. कोणी कितीही बडबड केली. तरीही पोलीस लवकरच तपास करून कारवाई करतील. आम्ही पुराव्यासह बोललो आहोत, बाकी पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे लवकरच पुढे येईल, असा इशारा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस