शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 16:02 IST

महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 

नागपूर : यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत दिले आहे. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून या अशा शिखंडीना पुढे केले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजप व सद्यपरिस्थितीवर कडाडून टीका केली. सध्यांच भाजपच नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान देत असतील तर तो त्यांचा खुळचटपणा आहे. असे कित्येक आव्हान शिवसेनेने पेलले, असे राऊत म्हणाले. महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका.वीस फूट खाली गाडले जाल, असा इशारा त्यांनी दिला. 

बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. हनुमान चालिसा पठण कुठेही करता येईल मात्र, त्यासाठी मातोश्रीची निवड करणं व त्यामागे कट-कारस्तान करणं हाच त्यांचा उद्देश्य आहे. ज्यांना हिंदुत्व शब्द घ्यायला लाज वाटत होती. आज तेच, श्रीराम, हनुमान यांच नाव घेऊन राजकारण करत आहे. बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवते, अशा बोगस खासदारांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये, असे राऊत म्हणाले. यासह, पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले.

सत्तेशिवाय तुमचा जीव तडफडतो आमचा नाही. तुम्हा गटांगळ्या खातायत आम्ही नाही. स्वत:ची पुढे येण्याची हिम्मत नाही व दुसऱ्यांना पुढे करून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर मिळेल. या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपलं कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी ठासून सांगितले. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत व यांच्यामागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते उभे राहतात असा थेट आरोप राऊत यांनी फडणवीसांवर केला.

मी आभार मानतो या लोकांच कारण त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद दिसून येते, शिवसेनेच मनगट किती मजबूत आहे याची प्रचिती आली. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील. यापुढे शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या स्मशानाच्या गोवऱ्या रचून यावं, असे राऊत म्हणाले. यासह अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कधीकाळी आमचे पाच आमदार होते. लवकरच मोठा मेळावा लावत आहोत. यापुढे अमरावतीत शिवसेनेचाच बोलबाला असेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस