पचखेडी येथे शिवजयंती महाेत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST2021-02-23T04:11:37+5:302021-02-23T04:11:37+5:30

कुही : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पचखेडी (ता. कुही) येथे नुकतेच शिवजयंती महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी ...

Shiv Jayanti festival at Pachkhedi | पचखेडी येथे शिवजयंती महाेत्सव

पचखेडी येथे शिवजयंती महाेत्सव

कुही : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पचखेडी (ता. कुही) येथे नुकतेच शिवजयंती महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनाेज तितरमारे, प्रणाली गजभिये, राजेंद्र मेश्राम, जीवनलाल डोंगरे, दिलीप भोयर, गुरुदेव वनदुधे, सेवक मुळे, प्रा. मनोहर हारगुडे, अंताराम ठाकरे, सपना मेश्राम, गुणवंता लांजेवार, विठ्ठल मुळे उपस्थित होते. प्रणाली गजभिये यांचे शिवरायांच्या जीवनकार्य व राज्यकारभारावर व्याख्यान झाले. रात्री माॅ कामाक्षी म्युझिकल ग्रुपच्या कलावंतांनी विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यशस्वितेसाठी अभिमन खराबे, लंकेश भजनकर, नितीन नवले, अक्षय वनदुधे, आशिष निकुळे, मुकेश मुळे, सूरज मंगर, राहुल भुसारी, अक्षय मुळे, राहुल भजनकर, भगवान मुळे, स्वप्नील भजनकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली हाेती.

Web Title: Shiv Jayanti festival at Pachkhedi