रामटेक येथे शिवजयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST2021-02-21T04:13:03+5:302021-02-21T04:13:03+5:30

रामटेक : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्थानिक राष्ट्रीय आदर्श विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सामाजिक परिवर्तनात ...

Shiv Jayanti celebration at Ramtek | रामटेक येथे शिवजयंती उत्सव

रामटेक येथे शिवजयंती उत्सव

रामटेक : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्थानिक राष्ट्रीय आदर्श विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सामाजिक परिवर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ऋतुजा नांगुलवार, उत्कर्ष कावळे, प्रशिका डोंगरे, रोशन टेटवार, समीर वाहने, रिद्धी आष्टनकर, अंजली दमाहे, निधी ठाकरे यांनी पारिताेषिके पटकावली. प्रमुख वक्ते श्रीराम आस्टनकर यांनी सामाजिक परिवर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातिवाद, अस्पृश्यता आदी बाबींना थारा दिला नाही, शेतकरी व नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी केले. म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणून संबाेधले जाते. तरुणांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजपरिवर्तनसाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सुधाकर मोहाेड, तुलाराम मेंढे, देवीदास कुथे, भालचंद्र भडके, मनोहर भगत, अण्णा हिरोळे, डॉ. राजेश ठाकरे, डॉ. ओम आष्टनकर, नाना उराडे, योगिता गायकवाड, राजेश बांते आदींनी सहकार्य केले.

Web Title: Shiv Jayanti celebration at Ramtek