पत्र सूचना कार्यालयाच्या सहायक संचालकपदी शशिन राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:04 IST2017-08-29T01:04:24+5:302017-08-29T01:04:40+5:30

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाºया नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक म्हणून शशिन राय यांनी सोमवारी सूत्र स्वीकारली.

Shishin Rai as Assistant Director of the letter notices | पत्र सूचना कार्यालयाच्या सहायक संचालकपदी शशिन राय

पत्र सूचना कार्यालयाच्या सहायक संचालकपदी शशिन राय

नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाºया नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक म्हणून शशिन राय यांनी सोमवारी सूत्र स्वीकारली. शशिन राय भारतीय माहिती सेवा (आय.आय.एस.) या संवर्गातील अधिकारी असून नागपूर येथे सहायक संचालक (माध्यम व संवाद) या पदाची सूत्रे सांभाळण्यापूर्वी ते भोपाळ येथील दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागाचे सहायक संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये मध्य प्रदेशातील होशंगाबाद व छिंदवाडा येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयामध्ये क्षेत्रीय प्रचार अधिकारी, आकाशवाणी, भोपाळ व दूरदरर्शन, नवी दिल्ली येथे वृत्त संपादक म्हणूनही कार्य केले आहे.

Web Title: Shishin Rai as Assistant Director of the letter notices