'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:58 AM2020-09-29T10:58:59+5:302020-09-29T11:01:21+5:30

तिला दोषी ठरवून आयुष्यभर कैदेत ठेवू नका, अशी कळकळीची विनंती सोमवारी पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य समितीपुढे केली.

'She' is not guilty ... don't keep her in jail for life! | 'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका!

'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका!

Next
ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांनी केली राज्य समितीपुढे कळकळीची विनंतीप्रकरण पांढरकवड्यातील वाघिणीचे

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ती’ खरोखरच दोषी नाही, तिने मुद्दाम महिलेवर हल्ला करून खाण्यासाठी ठार केले नाही. ठार करणे हा तिचा हेतू नव्हता. त्यामुळे तिला दोषी ठरवून आयुष्यभर कैदेत ठेवू नका, अशी कळकळीची विनंती सोमवारी पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य समितीपुढे केली.
हे प्रकरण पांढरकवडा येथून पकडून आणलेल्या टीटी-२सी-१ या वाघिणीच्या संदर्भातील आहे. या वाघिणीचा मानवी वस्तीत वावर वाढला होता. अलीकडेच एका महिलेवर हल्ला करून या वाघिणीने ठार केले होते. त्यामुळे जन आक्रोश लक्षात घेता तिला नागपुरात आणण्यात आले होते. सध्या ही वाघीण येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये देखरेखीखाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वनमंत्री संजय राठोड यांनी सेंटरमध्ये येऊन या वाघिणीची माहिती अधिकाºयांकडून जाणून घेतली होती. मुख्यमंत्रीदेखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

या वाघिणीकडून माणसांवर हल्ले करण्याच्या दोन वेळा घटना घडल्याची नोंद वनविभागाच्या रेकॉर्डवर आहे. पहिल्या घटनेत तिने रस्त्यात आलेल्या एका व्यक्तीला पंजा मारला होता, तर दुसऱ्या घटनेमध्ये गेल्या आठवड्यात तिने एका महिलेवर हल्ला करून ठार केले. त्यामुळे या वाघिणीला कैदेत ठेवायचे की अन्य जंगलात निसर्गमुक्त करायचे याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, अनाथ वाघांच्या बछड्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समितीसमोर आज सोमवारी पांढरकवड्याचे मुख्य वनसंरक्षक रामाराव आणि टिपेश्वर अभयारण्याचे डीएफओ पुरानिक यांनी बाजू मांडली. ही वाघीण निर्दोष असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

रस्त्यात आलेल्या महिलेला तिने तोंडाने पकडले नाही तर पंजा मारला. त्यानंतर, ती महिला मरण पावली. मात्र तासभर प्रेताजवळ बसूनदेखील या वाघिणीने प्रेत खाल्ले नाही. यावरून या वाघिणीचा हेतू महिलेला ठार करणे हा नव्हता, ती नरभक्षी ठरू शकत नाही, असे या अधिकाऱ्यांनी समितीचे अध्यक्ष अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हुडा यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. पुराव्यादाखल त्यांनी मागील जून महिन्यापासूनचा या वाघिणीचा रेकॉर्डदेखील सादर केला. या काळात वाघिणीने कोणत्याही चुका केल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पांढरकवडा येथील दोन्ही अधिकाºयांची बाजू ऐकून घेतल्यावर समितीने या वाघिणीसंदर्भात अभिप्राय देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा या विषयावर समितीपुढे चर्चा होणार आहे. त्यामुळे या समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

अधिकार मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना प्रत्यक्षात या वाघिणीच्या शिक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याचे अधिकार या समितीला नाही. केवळ ही वाघीण दोषी आहे की निर्दोष आहे हे ठरविण्याचे अधिकार फक्त या समितीला आहेत. त्यामुळे समितीच्या अभिप्रायानंतर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हेच आपला कायदेशीर निर्णय घेऊ शकतात. त्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होऊ शकते.

 

Web Title: 'She' is not guilty ... don't keep her in jail for life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.