शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

‘रक्ताचे नाते’ गमावलेली ‘ती’ लग्नाच्या बेडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. ‘आईची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. ‘आईची माया आणि पित्याची छत्रछाया’ गमावलेली असंख्य कुटुंबे अजूनही हुंदकेच देत आहेत. कुणाचा भाऊ बेड न मिळाल्याने दगावला तर कुणाच्या बहिणीने कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. काका, मामा, आत्या, मावशी तर कुणाच्या अगदी जीवलग मित्रावरही आघात झाला. अनेकांनी तर रक्ताची नातीसुद्धा गमावली. उमरेड येथील अशाच एका तरुणीच्या आईवडिलांच्या निधनानंतर सांभाळ करणाऱ्या आजीचा कोरोनामुळे जीव गेला. रक्ताच्या नात्यांचे छत्र हरविले. केवळ आजीच तिचा ‘कंठ’ असतानाच दुष्ट कोरोनाने हा आनंदही तिच्यापासून हिरावला. अशातच सामाजिकतेचा वसा जोपासलेल्या या नगरीतील काही कार्यकर्त्यांनी तिचे दु:ख हेरले. ‘घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबतीला’ असे म्हणत तिला हिंमत दिली. आज रविवारी (दि.२७) ‘ती’ लग्नाच्या बेडीत अडकली.

सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकत्त्व स्वीकारल्यानंतर आईवडिलांचे छत्र हरविलेल्या पल्लवी मोहन मसराम या तरुणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पल्लवीच्या आईचे (संगीता) माहेर उमरेडचे. लग्नानंतर रामटेक येथील मोहन मसराम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्याला पल्लवी ही एकुलती एकच! अशातच सुमारे चार ते पाच वर्षापूर्वी लागोपाठ आईवडिलांच्या मृत्यूने पल्लवी कमालीची हादरली.

तिच्या उमरेड येथील आजीने ‘सावली’ देत तिला सावरले. आजी सुभद्रा सलामे (५५) हिच्या छत्रछायेत पल्लवीचे दु:ख काहीसे हलके झाले होते. अशातच कोरोनाच्या चक्रव्यूहात आजी सुभद्रा सापडली. जीवनमृत्यूच्या लढाईत मृत्यू जिंकला. आजी सुभद्रा हरली. एप्रिल २०२० ला सुभद्रा सलामे यांचा मृत्यू झाला. पल्लवीच्या पायाखालची वाळूच सरकली. ही बाब कळताच अनेकांनी पल्लवीला मदतीचा हात दिला.

पल्लवी मसराम नागपूर येथील अक्षय पेंदाम या तरुणासोबत विवाहबद्ध झाली. उमरेडच्या महिला महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पल्लवीस प्रभाकर हत्तीमारे यांनी भावाचे नाते जोपासत बळ दिले. मदतीचा हात दिला. तिच्या लग्नकार्यात मंगेश गिरडकर, घनश्याम लव्हे, नागेश भिवनकर, योगेश मस्की, महेश भुयारकर, मुकेश आंबोने आदींनी सहकार्य आणि धावपळ केली.

......

‘ती’ भावूक झाली

रविवारी उमरेडच्या राममंदिरात नियमावलीचे पालन करीत सकाळी १०.३० वाजता पल्लवी आणि अक्षय विवाह बंधनात अडकले. शनिवारी सुषमा पारवे यांनी आईचे कर्तव्य पार पाडत पल्लवीला ‘साडी-चोळी’ आणि भेटवस्तू प्रदान केली. शिवाय, आज रक्ताच्या नात्यांपैकी कुणीही नसताना अनेक जण मदतीला धावून आल्याने पल्लवी काहीशी भावूक झाली होती.