शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ दुचाकीसह उड्डाणपुलाहून खाली पडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:37 IST

स्कॉर्पिओने समोरच्या दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील मंजुषा मारुती दलाल (वय ३६) नामक परिचारिकेचा उड्डाणपुलावरून खाली पडून करुण अंत झाला.

ठळक मुद्दे परिचारिकेचा अंत : मानकापूर उड्डाणपुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कॉर्पिओने समोरच्या दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील मंजुषा मारुती दलाल (वय ३६) नामक परिचारिकेचा उड्डाणपुलावरून खाली पडून करुण अंत झाला.

गुरुवारी दुपारी मानकापूरच्या उड्डाणपुलावर हा भीषण अपघात घडला.मंजुषा गोधनीच्या कलेक्टर कॉलनीत राहत होती. ती धंतोलीतील एका खासगी इस्पितळात परिचारिका म्हणून सेवारत होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या अ‍ॅक्टिव्हाने गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास कर्तव्यावर जाण्यासाठी निघाली. उड्डाणपुलावर मानकापूर ते पागलखाना चौक मार्गावर तिच्या दुचाकीला मागून निष्काळजीपणे वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओ (क्रमांक एमपी २२/ टी ०८७६) च्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. स्कॉर्पिओचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे मंजुषा उड्डाणपुलावरून खाली पडली. तिच्या दुचाकीचीही पुरती मोडतोड झाली. मंजुषा रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झाली. दरम्यान, पुलावरून तरुणी खाली पडल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी एकच आरडाओरड केला. काहींनी नियंत्रण कक्षाला फोन केले. त्यानंतर सदर पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, आरोपी स्कॉर्पिओचालक मानकापूर चौकाजवळ वाहन सोडून पळून गेला. त्याच्या वाहनाच्या नंबरप्लेटचेही तुकडे तुकडे झाले होते. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी मृत मंजूषाच्या घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मृत मंजुषाची बहीण शहर पोलिस दलात वायरलेस विभागात काम करत असल्याचेही स्पष्ट झाले.दुसऱ्याच चालकाला पकडलेमंजुषाचा बळी घेणारा स्कॉर्पिओ चालक असल्याचे कळाल्यामुळे पोलिसांनी आरोपीची शोधाशोध केली. संशयावरून दुसऱ्याच एका स्कॉर्पिओचालकाला ताब्यात घेतले. मात्र मानकापूर चौकात अपघातग्रस्त स्कॉर्पिओ उभी असल्याचे कळाल्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ती ताब्यात घेतली. तुटलेल्या नंबरप्लेटला जोडून स्कॉर्पिओचा नंबर मिळवला आणि आरोपीचा शोध सुरू केला.बहिणीच्या अपघाताने ती सुन्न पडलीपोलीस दलात असलेल्या मंजुषाच्या बहिणीने तिच्या अपघाती मृत्यूचे वृत्त ऐकले आणि ती काही वेळेसाठी सुन्नच पडली. तिने सांगितलेल्या माहितीनुसार, मंजुषा तिला या उड्डाणपुलावरून जात नको जाऊ, असे नेहमी बजावत होती. या पुलावरून वाहनचालक अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवितात, असेही सांगत होती. आज ती स्वत:च त्या उड्डाणपुलावरून दुचाकीने निघाली आणि निष्काळजी वाहनचालकाने तिचा बळी घेतला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू