अतिप्रसंग करू पाहणाऱ्याच्या तावडीतून तिने केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:33+5:302021-05-25T04:07:33+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव सोनू आहे. पीडित २७ वर्षीय ...

She escaped from the clutches of those who tried to commit adultery | अतिप्रसंग करू पाहणाऱ्याच्या तावडीतून तिने केली सुटका

अतिप्रसंग करू पाहणाऱ्याच्या तावडीतून तिने केली सुटका

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव सोनू आहे. पीडित २७ वर्षीय तरुणी होम पेशंट केअर टेकरचे काम करते. सोमवारी सकाळी तिच्या घरी सोनू नामक आरोपी पोहोचला. वडिलांनी बोलविले आहे, असे सांगून त्याने तिला आपल्या कारमध्ये बसविले. एकांत स्थळी कार थांबवून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीला जोरदार लाथ हाणली आणि कारचे दार उघडून बाहेर पडली. आरोपीने तिचा पाठलाग केला आणि झालेली घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्याच्या धमकीला भीक न घालता तिने सरळ पोलीस ठाणे गाठले. झालेली घटना पोलिसांना ऐकवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

--

Web Title: She escaped from the clutches of those who tried to commit adultery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.