शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

नागपुरात लग्नापूर्वीच घेतला तिने भावी नवऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:15 IST

ती वर्धेची अन् तो मूळचा वणीजवळचा. दोघेही शिक्षित. तो नागपुरात चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीवर. त्याचे अन् तिचे लग्न जुळले. साक्षगंध झाले अन् लग्नाची तिथीही काढण्यात आली. तो सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवू लागला, मात्र त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्याने तिच्या मोबाईलमध्ये तिची प्रियकरासोबत नको त्या अवस्थेतील चित्रफीत बघितली अन् त्याचे भावविश्व उजाडले. पाप उघड झाल्यानंतर ती जास्तच शिरजोर झाली. तिने आणि तिच्या मैत्रिणीने त्या तरुणाला जगणे मुश्किल करण्याची धमकी देणे सुरू केले. तिच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्याने अखेर बुधवारी सकाळी त्याने आत्महत्या केली. एखाद्या चित्रपटातील सूडकथा वाटावी अशी ही घटना नागपुरात घडली आहे.

ठळक मुद्देप्रियकरासोबतची चित्रफीत दिसूनही निर्ढावलेपणाधमक्या देऊन केले आत्महत्येस प्रवृत्त : बजाजनगरातील सूडकथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ती वर्धेची अन् तो मूळचा वणीजवळचा. दोघेही शिक्षित. तो नागपुरात चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीवर. त्याचे अन् तिचे लग्न जुळले. साक्षगंध झाले अन् लग्नाची तिथीही काढण्यात आली. तो सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवू लागला, मात्र त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्याने तिच्या मोबाईलमध्ये तिची प्रियकरासोबत नको त्या अवस्थेतील चित्रफीत बघितली अन् त्याचे भावविश्व उजाडले. पाप उघड झाल्यानंतर ती जास्तच शिरजोर झाली. तिने आणि तिच्या मैत्रिणीने त्या तरुणाला जगणे मुश्किल करण्याची धमकी देणे सुरू केले. तिच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्याने अखेर बुधवारी सकाळी त्याने आत्महत्या केली. एखाद्या चित्रपटातील सूडकथा वाटावी अशी ही घटना नागपुरात घडली आहे. चेतन संजयराव पोटदुखे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी (जि. यवतमाळ) जवळच्या चिखलगाव येथील चेतन पोटदुखे रिझर्व्ह बँकेत नोकरीवर होता. नोकरीच्या निमित्ताने अत्रे लेआऊटमधील आरबीआय कॉलनीत तो राहत होता. चांगली नोकरी आणि चांगल्या पगाराच्या तरुण मुलाच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी स्थळ शोधणे सुरू केले. मध्यस्थांमार्फत वर्धा येथील पायल आकरे (वय २६) हिचे स्थळ आले. चेतन आणि पायलचे ३० एप्रिल २०१८ ला साक्षगंध झाले अन् २ जुलै २०१८ ला लग्न करण्याचे निश्चित झाले. दोन्ही पक्षाकडून लग्नाची तयारी सुरू झाली. इकडे पायल चेतनच्या रूमवर येऊन थांबू लागली. तो भावी पत्नी म्हणून तिचे आतापासूनच लाड पुरवू लागला. जाताना सोबत पैसेही देऊ लागला. काही दिवसांपूर्वी ती अशीच चेतनच्या रूमवर आली. ती बाथरूमला गेली असता चेतनने तिचा सहजपणे मोबाईल हाताळला अन् त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळले. जिच्यासोबत तो पत्नी म्हणून जीवन जगण्याचे स्वप्न बघत होता ती तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत त्याला दिसली. ते पाहून त्याने तिला विचारणा केली. पायलने जुने सर्व विसरून नवा संसार बसवण्याची गोष्ट न करता चेतनसोबत निर्ढावलेपणाने वागली. त्यामुळे त्याने तिच्यासोबतचे लग्न तोडले.धमक्या अन् बरेच काहीलग्न तोडण्याचे कारण सगळ्यांना कळल्याने ती सूडाने पेटून उठली. तिने तिच्या पुण्यातील रुतूजा नामक मैत्रिणीसोबत संगनमत करून चेतनवर सूड उगविणे सुरू केले. ती त्याला वारंवार फोन करून धमक्या देऊ लागली. नको त्या भाषेत बोलतानाच त्याचे जगणे मुश्किल करण्याची भाषा ती चेतनसोबत बोलताना वापरत होती. खोट्या आरोपात गोवण्यासाठी पोलिसात तक्रार देण्याचीही ती धमकी देत होती. या एकूणच प्रकारामुळे चेतन कमालीचा व्यथित झाला. तिच्या धमक्यांना कंटाळून त्याने बुधवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.सहा पानांची सुसाईड नोटत्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच त्याचे आईवडील आप्तस्वकीयांसह नागपुरात पोहचले. चांगला मुलगा, चांगल्या पगाराची नोकरी असलेला अन् तीन आठवड्यांवर लग्न आलेले असताना चेतनने आत्महत्या केल्याने त्याचे कुटुंबीय हादरले. त्यांनी आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चेतनने गळफास लावण्यापूर्वी सहा पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने आत्महत्या करण्यामागची खुलासेवार पार्श्वभूमी लिहिली. ती वाचून चेतनचे वडील संजयराव पोटदुखे यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. सुसाईड नोटमधील चेतनची व्यथा अन् त्याने केलेल्या आरोपावरून हवलदार विनोद क्षीरसागर यांनी आरोपी पायल आकरे आणि रुतूजा या दोघींविरुद्ध चेतनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. या घटनेला आता ३६ तास झाले मात्र आरोपींना अटक झालेली नव्हती.

 

टॅग्स :WomenमहिलाCrimeगुन्हा