शरदराव जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:42+5:302021-05-15T04:08:42+5:30

नागपूर : आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, मातंग समाजाचे नेते शरदराव बिसन जाधव (रा. ट्रस्ट ले आऊट) यांचे ...

Sharadrao Jadhav passes away | शरदराव जाधव यांचे निधन

शरदराव जाधव यांचे निधन

नागपूर : आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, मातंग समाजाचे नेते शरदराव बिसन जाधव (रा. ट्रस्ट ले आऊट) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.

यशोदाबाई बांबोडकर

यशोदाबाई हरिभजन बांबोडकर (७२, रा.गाैतमनगर, जुनी छावणी, कामठी) यांचे निधन झाले. राणीतलाव माेक्षघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आहेत.

माेहन भलावे

मोहन किशनराव भलावे (४७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

वसंतमाला भिवगडे

वसंतमाला मधुकर भिवगडे (८२, रा.माॅडेल टाऊन, बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दाेन मुले, तीन मुली व नातवंडे आहेत.

जसवंतराव काेठारी

जसवंतराव काेठारी (८२, रा.नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

ज्ञानेश्वर बिटे

ज्ञानेश्वर रामाजी बिटे (७८, रा.लाडीकर ले आऊट, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दाेन मुले, मुलगी व नातवंडे आहेत.

कीर्तलाल यादव

कीर्तलाल रामप्रसाद यादव (७०, रा.उदासीन आश्रम, धंतोली) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अमरावती येथे करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली आहेत.

चिंधबाजी काेरडे

चिंधबाजी आड़कुजी कोरडे (८१, रा.पारडी, पांढुर्णा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी व पाच मुले आहेत.

कृष्णकांत नवघरे

कृष्णकांत राम नवघरे (५३, रा.स्वावलंबीनगर) यांचे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी व मुलगा आहे.

पूर्णा बरूआ

पूर्ण बरूआ (४४, रा.शिवाजी काॅम्प्लेक्स, मानकापूर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sharadrao Jadhav passes away