शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्रामच्या बापू कुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2023 19:13 IST2023-02-07T19:11:51+5:302023-02-07T19:13:11+5:30

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटीत दर्शनासाठी येत आहेत. सेवाग्राम आश्रमालगतच विदर्भातील एनजीओंच्या प्रतिनिधींची एक परिषद होत आहे. तीत पवार उपस्थित राहून प्रतिनिधींशी संवाद साधतील.

Sharad Pawar at Bapu Kuti of Sevagram on February 12 | शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्रामच्या बापू कुटीत

शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्रामच्या बापू कुटीत

ठळक मुद्देएनजीओंच्या प्रतिनिधींशी साधणार संवाद जाहीर सभेची शक्यता

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ फेब्रुवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटीत दर्शनासाठी येत आहेत. सेवाग्राम आश्रमालगतच विदर्भातील एनजीओंच्या प्रतिनिधींची एक परिषद होत आहे. तीत पवार उपस्थित राहून प्रतिनिधींशी संवाद साधतील.

रविवारी सकाळी पवार यांचे नागपुरात आगमन होईल. येथून ते वर्धेसाठी रवाना होतील. महागाई, बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी काढलेली जनजागरण यात्रा १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान वर्धा जिल्ह्यात आहेत. या यात्रेत पवार सहभागी होणार आहेत. यानंतर वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दुपारनंतर वर्धेच्या सर्कस ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sharad Pawar at Bapu Kuti of Sevagram on February 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.