Sharad Pawar arrives at Nagpur Airport | शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर आगमन
शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर आगमन

ठळक मुद्देपीक नुकसानीची पाहणी करणार


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे गुरुवारी सकाळी १० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, प्रकाश गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी पवार येथे आले आहेत. राज्यात राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात आले आहेत. डॉ. बाबासाहेब विमानतळावरून ते काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेला ते उपस्थित राहतील व नंतर एका कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Web Title: Sharad Pawar arrives at Nagpur Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.