शरद पवार यांचे नागपुरात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:32 IST2019-12-17T17:32:26+5:302019-12-17T17:32:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी संध्याकाळी नागपूरला आगमन झाले.

शरद पवार यांचे नागपुरात आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी संध्याकाळी नागपूरला आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते विदर्भातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे विदर्भात भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न तर पवार करत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु २०१४ मध्ये भाजपने त्याला छेद दिला. आता पुन्हा या किल्ल्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादीची बांधणी करण्यासाठी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे.