शरद बागडी एशिया प्राइड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:40+5:302021-03-04T04:12:40+5:30

नागपूर : इंटरनॅशनल ह्युमिनिटी मिशन ऑर्गनायझेशन व नॅशलन अ‍ॅन्टी हॅरेशमेंट फाउण्डेशनद्वारे आयोजित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात शरद गोपीदासजी बागडी यांना ...

Sharad Bagdi honored with Asia Pride International Award | शरद बागडी एशिया प्राइड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

शरद बागडी एशिया प्राइड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नागपूर : इंटरनॅशनल ह्युमिनिटी मिशन ऑर्गनायझेशन व नॅशलन अ‍ॅन्टी हॅरेशमेंट फाउण्डेशनद्वारे आयोजित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात शरद गोपीदासजी बागडी यांना एशिया प्राइड अवाॅॅर्ड -२०२१ने पुरस्कृत करण्यात आले. शरद बागडी हे लेखक व वरिष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्याबद्दल आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय व २८ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बागडी यांना हा पुरस्कार साहित्य लेखन, आरोग्य, मेडिकल, शिक्षण व क्रीडाक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला आहे.

राष्ट्रीय मत्सव्यवसाय सहकारी संघाच्या संचालकपदी प्रकाश लोणारे यांची निवड

()

नागपूर : राष्ट्रीय मत्सव्यवसाय सहकारी संघ, नवी दिल्ली (फिशकॉपफेड)च्या निवडणुकीत सहकार भारतीचे प्रकाश लोणारे यांची संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे. २०११ ते २०१६ या काळात लोणारे यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. लोणारे हे भाजपचे प्रदेश सदस्य आहे. तलाव ठेक्याने देण्याबाबत शासनाने नेमलेल्या पडताळणी समितीचे ते सदस्य आहे. नागपूर जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे ते अध्यक्ष आहे.

Web Title: Sharad Bagdi honored with Asia Pride International Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.