शांतिनगर ठाण्यातील उपनिरीक्षक जेरबंद

By Admin | Updated: October 26, 2016 03:14 IST2016-10-26T03:14:39+5:302016-10-26T03:14:39+5:30

शांतिनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेश भाऊरावजी खंदाडे (वय ३७) याला १० हजारांची लाच स्वीकारताना

Shantinagar Thane Sub-Inspector Jirband | शांतिनगर ठाण्यातील उपनिरीक्षक जेरबंद

शांतिनगर ठाण्यातील उपनिरीक्षक जेरबंद

प्रॉपर्टी डीलरची तक्रार : १० हजारांची लाच स्वीकारली, एसीबीची कारवाई
नागपूर : शांतिनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेश भाऊरावजी खंदाडे (वय ३७) याला १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शांतिनगर पोलीस ठाण्यात एसीबीने आज सायंकाळी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली.
शांतिनगर परिसरातील प्रॉपर्टी डीलरने एका घराची विक्री करून दिली. या घरात भाडेकरू राहत होते. घराचा ताबा देताना प्रॉपर्टी डीलरने आपल्या घरातील साहित्य चोरून नेल्याची तक्रार शांतिनगर ठाण्यात भाडेकरू महिलेने नोंदविली. या तक्रारीची चौकशी करताना पोलीस उपनिरीक्षक खंदाडेने प्रॉपर्टी डीलरला बोलविले आणि कारवाई टाळण्याच्या बदल्यात भल्या मोठ्या रक्कमेची लाच म्हणून मागणी केली. प्रॉपर्टी डीलरने १० हजार रुपये लाच देण्याची तयारी दाखवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दराडे यांनी सापळा रचत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, मनोज गभने, हवलदार उत्तम दास, हवालदार दिनेश शिवले, नायक शंकर कांबळे, अमोल फिस्के, शिपाई प्रभाकर बले यांनी तक्रारदारासोबत मंगळवारी सायंकाळी शांतिनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारदाराकडून लाचेचे १० हजार स्वीकारताच खंदाडेला एसीबीच्या पथकाने पकडले. त्याच्याविरुद्ध तो कार्यरत असलेल्या शांतिनगर ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. (प्रतिनिधी)

दोन वर्षांपूर्वीच रुजू
राजेश हा पूर्वी पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. त्याने उपनिरीक्षकाची परीक्षा पास केली. दोन वर्षांपूर्वी तो पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवारत झाला अन् आज एसीबीच्या जाळ्यात अडकला.

Web Title: Shantinagar Thane Sub-Inspector Jirband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.