संपदा देशमाने, श्रुती तिडके सोनल जोगदंड चमकले

By Admin | Updated: August 29, 2014 01:00 IST2014-08-29T01:00:31+5:302014-08-29T01:00:31+5:30

लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपदा धीरज देशमाने

Shanti Tadke Sonal Jogdand shine brightly in the country | संपदा देशमाने, श्रुती तिडके सोनल जोगदंड चमकले

संपदा देशमाने, श्रुती तिडके सोनल जोगदंड चमकले

निबंध स्पर्धा : कॅम्पस क्लब व दौलतराव ढवळे संस्थेचे आयोजन
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपदा धीरज देशमाने (श्री सत्यसाई कॉन्व्हेंट, ५००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह), द्वितीय श्रृती चिंतामण तिडके (विदर्भ बुनियादी हायस्कूल, इयत्ता ६ वी, ३००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह तर तृतीय क्रमांक सोनल प्रकाश जोगदंड, (हडस हायस्कूल, इयत्ता ८ वी, २००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह) हिने पटकावले. तनिष्का काकडे (पंडित बच्छराज विद्यालय, इयत्ता ६ वी, प्रमाणपत्र व मानचिन्ह) आणि सृष्टी महिंद्र रोडे (तेजस्विनी विद्या मंदिर, वर्ग ८ वा, प्रमाणपत्र व मानचिन्ह) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. मी पंतप्रधान झालो तर व विशुद्ध पर्यावरण, एक सामाजिक जबाबदारी हे निबंधाचे विषय होते.
स्पर्धेसाठी जवळपास शहरातील १०० ते १५० शाळांतील विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येत निबंध पाठविले होते. दोनपैकी एका विषयावर विद्यार्थ्यांना २०० शब्दात निबंध लिहायचा होता. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मी पंतप्रधान झालो तर... या विषयावर आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्यांच्या बुद्धीच्या मानाने आपला देश कसा असायला हवा किंवा कोणकोणते नियम लावले पाहिजेत तसेच देशात जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे, तो थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावर काय उपाय केले पाहिजेत, हेसुद्धा मुलांनी स्पष्ट केले. तसेच विशुद्ध पर्यावरण एक सामाजिक जबाबदारी या सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपले विचार मांडले. निबंध स्पर्धेचे परीक्षण रश्मी वाटाणे यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री सत्य साई कॉन्व्हेंटमध्ये होईल. अधिक माहितीकरिता लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, नागपूर येथे मोबाईल ९८२२४०६५६२ / ८४२१९५२१६७ वर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: Shanti Tadke Sonal Jogdand shine brightly in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.