नागपूर : आंबेडकरी विचार गावागावात पाेहचविण्यासाठी कार्य करणारे लाेककवी, गायक दिवंगत नागाेराव पाटणकर यांच्या पत्नी शांताबाई पाटणकर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रसिद्ध आंबेडकरी प्रबाेधनकार गायक प्रकाशनाथ पाटणकर यांच्या त्या आई हाेत. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजता वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
दयाबेन राजा ()
दयाबेन न्यालचंदभाई राजा (९१, रा. जलारामनगर, कळमना राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाकर गाडे ()
कमलाकर वि. गाडे (८०, रा. विनाेबा ग्राम साेसायटी, इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आहेत.
धर्मिष्ठाबेन पारेख ()
धर्मिष्ठाबेन नरेंद्रभाई पारेख (७४) यांचे निधन झाले. पारेख ज्वेलर्सचे संचालक विशाल पारेख यांच्या त्या आई हाेत. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमती राजधरकर ()
सुमती देवरावजी राजधरकर (७८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृदुला चक्रवर्ती ()
मृदुला एस. चक्रवर्ती यांचे निधन झाले. एसईसी रेल्वेचे माजी डीएमई एस. चक्रवर्ती यांच्या त्या पत्नी हाेत. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आहेत.
राजेंद्रसिंह गहलोत ()
महाराणा प्रताप स्मृतिमंदिर संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह गहलोत (रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विश्वास जोशी ()
महालेखाकार विभागातील कर्मचारी विश्वास विनायक जोशी (५८, रा. गजानननगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काैशल्याबाई राेटके ()
काैशल्याबाई महादेव राेटके (८१, रा. जुना फुटाळा, अमरावती राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व तीन मुले आहेत.
शरद डाेहारे ()
शरद नागाेराव डाेहारे (५२, रा. सावरकरनगर, खामला राेड) यांचे निधन झाले. ते कलार समाजाचे सदस्य हाेते. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामभाऊ पारखेडकर ()
डॉ. रामभाऊ दिवाकर पारखेडकर (७०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताराबाई भाेळे ()
ताराबाई जागेश्वर भोळे (९१, रा. राजीवनगर, साेमलवाडा) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले व तीन मुली आहेत.
लीलावती राऊत ()
जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीलावती मनोहर राऊत (८०, रा. तेलंगखेडी ले-आऊट, रामनगर) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रंगकर्मी योगेश राऊत यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, स्नुषा, नातवंडे आहेत.
कमलाबाई काळे ()
कमलाबाई किसनराव काळे (८१, रा. नंदनवन, एनआयटी काॅलनी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व तीन मुले आहेत.
मनीष व्यास ()
पुष्करणा समाजाचे सदस्य मनीष धन्नालाल व्यास-डावाणी (४४, रा. सीताबर्डी टेकडी राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.