चाकूचा धाक दाखवून महिलेशी लज्जास्पद वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST2021-09-27T04:08:19+5:302021-09-27T04:08:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलेच्या घरात शिरून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या एका भामट्याने नंतर विरोध करणाऱ्या महिलेला आणि ...

Shameful treatment of a woman with a knife | चाकूचा धाक दाखवून महिलेशी लज्जास्पद वर्तन

चाकूचा धाक दाखवून महिलेशी लज्जास्पद वर्तन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिलेच्या घरात शिरून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या एका भामट्याने नंतर विरोध करणाऱ्या महिलेला आणि तिच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. कपिलनगरात ही घटना घडली.

तक्रारदार महिला (वय ३०) शिवणकाम करते. आरोपी मोनू भास्कर आडकिने (वय ३३, रा. हिवरीनगर, नंदनवन) सोबत तिची ओळख आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून अधूनमधून महिलेकडे येतो. अलीकडे त्यांच्यात कटुता आल्याने आरोपीने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. शनिवारी दुपारी तो महिलेच्या घरी आला आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागला. महिलेने विरोध केल्यामुळे तो चिडला. त्याने अश्लील शिवीगाळ केली. मुलगा पुढे आला असता आरोपी मोनूने महिला तसेच मुलाला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पळून गेला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंग करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

---

Web Title: Shameful treatment of a woman with a knife