शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद... बापाकडूनच साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 11:07 IST

तक्रार केल्यास घटस्फोटाची दिली होती धमकी, हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल

नागपूर : नराधम बापाने स्वत:च्याच साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना नागपुरात समोर आली आहे. आरोपीने मुलीच्या हत्येची धमकी दिल्यानंतर तिच्या आईने तीन महिन्यांनंतर तक्रार दाखल केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व या प्रकरणाने पोलीसदेखील सुन्न झाले.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी संबंधित महिला स्वत:चा व्यवसाय चालविते. तिचा पती महिला आणि दोन्ही निष्पाप मुलींना मारहाण करायला लागला. महिला आणि तिची आई ब्यूटी प्रोडक्ट्स विकण्यासाठी पहाटे घरून निघायचे. मुली आरोपीसोबत घरातच राहत होत्या. २८ मे रोजी महिला लवकर घरी परतली. घरात प्रवेश करताच तिला तिचा पती तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलीसह आक्षेपार्ह हरकती करताना दिसला. तिने त्याला फटकारले असता पतीने वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यावर त्याने महिलेला मारहाण करून घटस्फोटाची धमकी दिली व तो कुटुंबासह बोरगाव येथे गेला.

काही दिवसांनी घरी परतल्यावर महिलेने केलेल्या कृत्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर आरोपीने परत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडितेने चैतन्य या सामाजिक संस्थेच्या सुनीता ठाकरे आणि हाफीज साबरी यांना आपबिती सांगितली. त्यांच्या मदतीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विनयभंग, मारहाण, धमकावणे आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने क्रौर्याची सीमा ओलांडली

आरोपी पित्याने क्रौर्याची सीमा ओलांडली होती. त्याने महिलेच्या मोठ्या मुलीच्या अंगावर चटके दिले होते. यासंदर्भात पत्नीने प्रश्न विचारला असता, ही माझी मुलगी नाही, असे सांगून तो लहान मुलीला घेऊन बोरगाव येथे आई-वडिलांच्या घरी गेला. दोन दिवसांनी मुलीला घरी आणल्यावर आरोपीही तिला मारहाण न करण्याचे आश्वासन देऊन घरी परतला. मोठ्या मुलीचे लैंगिक शोषण उघडकीस येताच त्याने लहान मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.

पत्नीवरदेखील लग्नाअगोदर केला होता अत्याचार

ती १६ वर्षांची असताना तिची नराधम आरोपीशी ओळख झाली. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. सदर पोलिसांनी तेव्हा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. यादरम्यान मुलगी गरोदर राहिली. त्याने लग्नाची तयारी दाखवल्यानंतर मुलीने बलात्कार प्रकरणात तडजोड केली होती. लग्न आणि मुलगी झाल्यामुळे महिला आरोपीसोबत राहू लागली. पुढे तिने दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूर