शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:10 IST

प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली.

ठळक मुद्देधावत्या बसमध्ये गुन्हा : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली.पीडित महिलेचे नुकतेच लग्न झाले. ती पुण्याला राहते. तिचे माहेर नागपुरात आहे. बुधवारी रात्री ती माहेरी येण्यासाठी खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) बसली. तिच्या बाजूला दोन सीटच्या मध्ये रिकाम्या जागेत आरोपी बसचालक मध्यरात्री झोपला. धावत्या बसमध्ये त्याने निद्रिस्त महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. तिने आरडाओरड करून सहप्रवाशांना ही माहिती दिली. त्यानंतर आपल्या माहेरच्यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी पहाटेचे ५ वाजले होते. माहेरच्यांनी अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना बस रविनगर चौकात थांबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बस थांबवून आरोपी बसचालक बाबाराज ज्योतप्पा पाटील (वय ३४) याला ताब्यात घेतले. तो कर्नाटकमधील सोलापूर, हुक्केरी, जि. बेळगाव येथील रहिवासी आहे. महिलेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी कर्नाटकमधील बसचालक पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर