शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळा; राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:06 IST

Nagpur : माजी आमदार नागो गाणार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी असूनही हजारो बोगस नियुक्त्या करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा राज्यभर उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्याची मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी केली आहे.

नियुक्तीसाठी एका एका शिक्षकाकडून ३०-४० लाख रुपये घेण्यात आले, तर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येकी ३-५ लाख घेऊन मान्यता दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला असून, पुण्याच्या शिक्षण आयुक्तांनी ५९ अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवणारा अहवाल सादर केला आहे.

दरम्यान, परभणीतील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज्यभरातून बोगस नियुक्ती, शालार्थ आयडी आणि अल्पसंख्याक दर्जा घोटाळ्याच्या तक्रारी वाढत असून, हे प्रकरण शेकडो कोटींचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. याचा विचार करता राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

सध्याची एसआयटी मर्यादित

  • नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ५८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत.
  • संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून, काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे.
  • नागपूर पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे, मात्र ही तपास फक्त नागपूरपुरती मर्यादित आहे.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणfraudधोकेबाजी