शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नागपूरच्या शैलजाने इराणला कबड्डीत केले आशियाई चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:07 AM

जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे.

ठळक मुद्देविवाहापूर्वी शैलजा पद्माकर धोपाडे म्हणून त्यांनी नागपूर विभागात कबड्डीमध्ये छाप सोडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. होय, आपण चर्चा करतोय ती शैलजा जैन यांची. विवाहापूर्वी शैलजा पद्माकर धोपाडे म्हणून त्यांनी नागपूर विभागात कबड्डीमध्ये छाप सोडली आहे.

आव्हान स्वीकारणे आवडतेकबड्डी जगतात चर्चेत असलेल्या मराठा लॉन्सर्सची दिग्गज खेळाडू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शैलजाला बालपणापासून आव्हान स्वीकारणे आवडत होते. त्यामुळे मुलींना मैदानावर पाय ठेवणेही मोठी बाब मानल्या जाणाºया ७० च्या दशकात सेंट उर्सुलाच्या या विद्यार्थिनीने कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बॉस्केटबॉल, व्हॉलिबॉल यासारख्या खेळांमध्ये नशीब आजमावल्यानंतर शैलजाने तत्कालीन प्रशिक्षक दिनूभाऊ शिर्के आणि राजाभाऊ समदूरकर यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीमध्ये कारकीर्द करण्याचा संकल्प केला आणि मराठा लॉन्सर्स क्लबला हळूहळू राष्ट्रीय पातळीवर आपल्या मेहनतीच्या जोरावर ओळख मिळवून देण्यात यशस्वी ठरली. दरम्यान शैलजाने बेंगळुरूमधून एनआयएस प्रशिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

अशी झाली इराण संघाची प्रशिक्षकशैलजा राज्य क्रीडा विभागात क्रीडा प्रशिक्षक म्हणून आपली सेवा देत होती, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची तिची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. ज्यावेळी तिला भारतीय संघासोबत जुळता आले नाही त्यावेळी तिने इराणसारख्या संघासोबत जुळण्याचा प्रयत्न केला.२०१४ मध्ये तिला इराण संघाकडून आमंत्रणही मिळाले, पण राज्य सरकारची कर्मचारी असल्यामुळे आमंत्रण स्वीकारणे शक्य झाले नाही. पण २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर शैलजा इराण कबड्डी संघासोबत जुळली आणि आपल्या अनुभव व दृढनिश्चयाच्या जोरावर इराण संघाला हे यश मिळवून दिले.

उत्साह वाढविण्यात आईचे विशेष योगदानप्रत्येक पाल्याच्या यशामध्ये त्याच्या आईवडिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. शैलजासाठी त्यांची आई (कमल पद्माकर धोपाडे) यांना विशेष महत्त्व आहे. जीवनात ८३ वर्षांचा कालखंड पूर्ण केल्यानंतरही आईचा उत्साह व आत्मविश्वास नव्या पिढीच्या कुठल्याही युवा सदस्यासाठी प्रेरणास्रोत ठरू शकतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या कमल यांना खेळाची विशेष आवड आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये शिक्षकाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी किमान सुविधांमध्ये बालकांना खेळामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आपल्या कार्यकाळाची आठवण करताना त्या म्हणतात,‘जीवनात खेळाला विशेष महत्त्व आहे. त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. मी आजही योगासोबत जुळलेली आहे. खेळासोबत जुळलेली असल्यामुळे वाढत्या वयातही मी सर्वप्रकारच्या कार्यात सहभागी होत असते. शैलजाने कुटुंबाला नवी ओळख दिली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आहे, संघर्ष करण्याची वृत्ती.’

टॅग्स :Sportsक्रीडाKabaddiकबड्डी