अंध मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 01:01 IST2016-09-03T01:01:58+5:302016-09-03T01:01:58+5:30

सेवानिवृत्त वैज्ञानिकाने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच एका दारुड्या पित्याने आपल्या अंध मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

Sexual torture on blind girl | अंध मुलीवर लैंगिक अत्याचार

अंध मुलीवर लैंगिक अत्याचार

नागपूर : सेवानिवृत्त वैज्ञानिकाने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच एका दारुड्या पित्याने आपल्या अंध मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सक्करदरा पोलीस ठाणे अंतर्गत उघडकीस आला. पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीला अटक केली.
१८ वर्षीय पीडित मुलगी अंध आहे. तिची ऐकण्याची क्षमताही कमी आहे. कुटुंबात आई-वडील आणि मोठा भाऊ आहे. एका वर्षापूर्वी नेत्रहिन शाळेतून सहावा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले. तीन वर्षांपूर्वी तिच्या एका भावाचा मृत्यू झाला. तेव्हापासून वडिलांना दारूचे व्यसन लागले. ते कधीकधीच वाहन चालवतात. आई शिलाईचे काम करून घर चालवते. पोळा जवळ असल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून तिची आई बैलांना सजवणाऱ्या वस्तू तयार करून त्या विकत होती. गुरुवारी सकाळी ती मुलासोबत सक्करदरा चौकात सामान विकण्यासाठी गेली होती. घरी वडील आणि अंध मुलगी होती. दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास दारुड्या वडिलाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे ती घाबरून गेली. जाताना आईने , गांधीसागर तलावाजवळील झुलेलाल मंदिराजवळ धान्य वितरित होत असल्याचे सांगत शेजारच्या महिलेसोबत जाण्यास सांगितले होते. घटनेच्या काही वेळानंतर ती शेजारी महिलेसोबत मंदिरात गेली. परत येताना तिने महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्या महिलेने लगेलच मुलीच्या आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने सक्करदरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली. आरोपीने पत्नीद्वारा फसविले जात असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual torture on blind girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.