मजुरीसाठी आलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST2021-03-15T04:09:08+5:302021-03-15T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पोटाची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर दोघांनी आलटूनपालटून अनेकदा बलात्कार केला. ...

Sexual abuse of a young woman who came for labor | मजुरीसाठी आलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण

मजुरीसाठी आलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पोटाची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर दोघांनी आलटूनपालटून अनेकदा बलात्कार केला. या कुकृत्यात झोपडीत राहणाऱ्या एका महिलेनेही आरोपींना साथ दिली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला.

पीडित तरुणी (वय २०) मध्य प्रदेशातील मंडला येथील रहिवासी आहे. अत्यंत गरीब घरच्या या तरुणीने कामाच्या शोधात डिसेंबर २०२० ला नागपूर गाठले. तिच्या गावातील आरोपी महिला (वय ४२) हिने तिला आपल्यासोबत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकामस्थळी नेले. तेथे मजुरांच्या झोपड्यावर ती राहू लागली. येथेच काम करणारा आरोपी गिरधारी देवीलाल रहांगडाले (वय २०, रा. नगपुरा, गोंदिया) आणि राजकुमार रमेश मरकाम (वय २०, रा. मंडला) या दोघांनी २१ डिसेंबर २०२० च्या सकाळी ८.३० च्या सुमारास जीवे मारण्याची धमकी देऊन या तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने ही बाब ओळखीच्या महिलेला सांगून मदत मागितली. मात्र, महिलेने कुछ नही होता, असे म्हणत त्यांना विरोध करू नको, असे म्हटले. तरुणी गप्प बसल्याचे पाहून आरोपी नेहमीच तिच्यावर बलात्कार करू लागले. तिच्या शारीरिक वेदनांकडेही आरोपी दुर्लक्ष करीत होते. तिने ही बाब आपल्या कुटुंबीयांना कळवली. त्यानुसार, कुटुंबीयांनी मंडला पोलिसांना तर मंडला पोलिसांनी अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, या प्रकरणात शनिवारी अंबाझरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी महिला तसेच मरकामला पोलिसांनी अटक केली. रहांगडालेचा शोध घेतला जात आहे.

-----

Web Title: Sexual abuse of a young woman who came for labor