सेक्स वर्कर्सची नागपुरात वर्दळ
By Admin | Updated: September 12, 2014 00:52 IST2014-09-12T00:52:07+5:302014-09-12T00:52:07+5:30
सेफ डेस्टिनेशन असल्याची खात्री पटल्यामुळे देशाच्या विविध महानगरातील सेक्स वर्कर्सची उपराजधानीत वर्दळ वाढली आहे. जाण्या-येण्याची आणि वास्तव्याची आलिशान व्यवस्था, अल्पावधीत मिळणारी तगडी

सेक्स वर्कर्सची नागपुरात वर्दळ
सेफ डेस्टिनेशन : वेश्याव्यवसाय जोरात
नरेश डोंगरे - नागपूर
सेफ डेस्टिनेशन असल्याची खात्री पटल्यामुळे देशाच्या विविध महानगरातील सेक्स वर्कर्सची उपराजधानीत वर्दळ वाढली आहे. जाण्या-येण्याची आणि वास्तव्याची आलिशान व्यवस्था, अल्पावधीत मिळणारी तगडी रक्कम आणि पोलिसांच्या कारवाईचा धाक नसल्यामुळे या गोरखधंद्यात सहभागी असलेल्या विविध महानगरातील मॉडेल, ड्रेस डिझायनरसह सुस्वरूप तरुणी नागपुरात देहविक्रयाला पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर पोलिसांनी यावर्षी अनेक ठिकाणी धाडी घालून पॉश कुंटणखान्यांवर कारवाई केली. यावेळी पकडल्या गेलेल्या सेक्स वर्कर्स आणि दलालांकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सहा महिन्यात नऊ ठिकाणच्या पॉश कुंटणखान्यावर कारवाई केली. यापैकी सीताबर्डीतील कारवाईत पंजाब (चंदीगड) मधील मॉडेल झेबा (नाव बदलविलेले) पोलिसांच्या हाती लागली. मुंबईच्या एजंटच्या माध्यमातून ती नियमित नागपुरात येत होती.
विमानाने येणे, महागड्या हॉटेलमध्ये मुक्काम करणे, दोन-तीन दिवस नागपुरात देहविक्रय करणे आणि लाखोंची रक्कम घेऊन निघून जाणे, असा तिचा क्रम होता. ४ आॅगस्टला पकडल्यानंतर तिने स्वत:च पोलिसांना ही माहिती दिली. ती आणि तिच्यासारख्याच अनेक सेक्स वर्कर्स पैशाच्या आमिषामुळेच नागपुरात वेश्याव्यवसाय करायला येत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. झेबासारखीच एक दाक्षिणात्य मॉडेल गेल्या वर्षी नागपुरात वेश्याव्यवसाय करताना पकडली गेली होती. गेल्या वर्षीच वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये हैदराबाद येथील एक मॉडेल आणि अहमदाबाद येथील एक देखणी सेक्स वर्कर सापडली होती.