नागपुरात कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:42 AM2018-04-25T01:42:47+5:302018-04-25T01:43:02+5:30

सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला.

Seven years imprisonment in Nagpur | नागपुरात कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा कारावास

नागपुरात कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा कारावास

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : २१ हजार रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला.
बिंदो गणेश पाटील (५०) असे आरोपीचे नाव असून ती बदनापूर, ग्वाल्हेर येथील मूळ रहिवासी आहे. ती नागपुरातील गंगाजमुना वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत होती. लकडगंज पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून अल्पवयीन मुलीची देहव्यापारातून सुटका केली. तसेच, आरोपी बिंदोविरुद्ध भादंवि व पिटा अंतर्गत गुन्हे नोंदवून तिला अटक केली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली. लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, हवालदार विजय हातकर, नामदेव पडोळे, प्रशांत चचाने आदींनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

Web Title: Seven years imprisonment in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.