शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

सात वर्षांचा सायकल चोर! चमचमीत खाण्याच्या मोहात तयार झाली बालगुन्हेगारांची टोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:19 IST

चार अल्पवयीन मुले ताब्यात : तीनशे ते पाचशे रुपयांना विकायचे सायकली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजूबाजूच्या मुलांना चमचमीत पदार्थ खाताना पाहून गरीब घरातील अल्पवयीन मुलांना काय चांगले, काय वाईट कळालेच नाही व पैसे मिळविण्यासाठी त्यांनी चक्क सायकलचोरांची टोळीच तयार केली. आश्चर्याची बाब म्हणजे टोळीतील सर्वात मोठा सदस्य १२ वर्षाचा, तर सर्वात लहान सदस्य सात वर्षांचा. ज्याचे दुधाचे दातदेखील पडले नाहीत तो चमचमीत पदार्थ व पानठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात सायकली चोरू लागला. पोलिसांनी चार मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांची ही चित्तरकथा ऐकून कर्मचारीदेखील अचंबित झाले.

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मनीषनगर, बेलतरोडी येथील रहिवासी फिर्यादी आशिष उमाटे (वय ४०) यांच्या मुलीची सायकल चोरी झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एका सात वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्या मुलासोबत इतर आणखी तीन ते चार साथीदार एकाच शाळेत शिकतात. सर्व मुले गरीब घरांतील असून, कुणाला आईवडील नाही, तर कुणी नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहे.

मुलांना अभ्यासात रस नसल्याने ते अनेकदा सोबत शाळेला दांडी मारतात. फिरत असताना ते अनेकदा विविध हॉटेल्सशेजारी गेले की तेथील खाद्यपदार्थ पाहून यांचीदेखील इच्छा होत होती. पैसे नसल्याने त्यांनी सायकली चोरायला सुरुवात केली. पहिली सायकल त्यांनी तीनशे रुपयांना विकली व त्यातून एका हॉटेलमध्ये जाऊन भरपेट नाश्ता केला.

चमचमीत खाण्यासाठी अन् सायकली विकण्यासाठी फंडेचोरलेल्या सायकली कवडीमोल भावात विकण्याची मुलांची तयारी असायची. कधी आईची प्रकृती खराब आहे असे कारण, तर कधी आजोबा-भाऊ दवाखान्यात दाखल झाला आहे अशी थाप ते मारायचे. एकदा तर अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याची बतावणी करत त्यांनी पाचशे रुपयांना सायकल दिली. एका मुलाला पानठेल्यावरील पुड्यांची आवड निर्माण झाली व त्यासाठी तो यात सहभागी झाला होता.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी