नागपुरातील काचीपुऱ्यात सात अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:55 IST2019-07-30T22:54:17+5:302019-07-30T22:55:23+5:30
महापालिका प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या काचीपुरा भागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविला. ही धार्मिक स्थळे काचीपुरा येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात बांधण्यात आली होती. पथकाने आधी काचीपुरा पोलीस चौकीजवळचे धार्मिक स्थळ पाडले. यादरम्यान नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बजाजनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई पार पाडण्यात आली.

नागपुरातील काचीपुऱ्यात सात अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या काचीपुरा भागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविला. ही धार्मिक स्थळे काचीपुरा येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात बांधण्यात आली होती. पथकाने आधी काचीपुरा पोलीस चौकीजवळचे धार्मिक स्थळ पाडले. यादरम्यान नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बजाजनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई पार पाडण्यात आली. यानंतर काचीपुरा वस्ती व व्हीएचबी सोसायटीच्या मागील रस्त्यावर असलेली सहा अनधिकृत धार्मिक स्थळे जेसीबीने पाडण्यात आली. प्रवर्तन विभागाच्या दुसºया पथकाने सतरंजीपुरा झोनअंतर्गत भंडारा रोड जुना बस स्टँड, शहीद चौक, इतवारी पोस्ट ऑफिस ते गोळीबार चौकापर्यंत फूटपाथच्या दोन्ही बाजूला असलेल्या ३२ अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. कारवाईत अतिक्रमणधारकांकडून एक ट्रक सामानही जप्त करण्यात आले. प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत भास्कर माळवे, संजय शिंगणे, विजय इरखेडे, ढाले व टीम सहभागी होती.