शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सात टन मांस जप्त

By admin | Updated: May 5, 2016 03:08 IST

विना परवाना व अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारा ट्रक कोंढाळी पोलिसांनी पकडला. यात सात टन मांस व ट्रक असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रकचालकास अटक केली आहे.

ट्रकचालकास अटक : अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूककोंढाळी : विना परवाना व अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारा ट्रक कोंढाळी पोलिसांनी पकडला. यात सात टन मांस व ट्रक असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रकचालकास अटक केली आहे. ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकडोह शिवारात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.रवी शंकरराव फुले (३२, रा. अमरावती) असे अटकेतील आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. ट्रकमधून विनापरवाना व अवैधरीत्या गुरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना कोंढाळी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चाकडोह शिवारात मध्यरात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एमपी-२०/एचबी-३५१८ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये अवैध कत्तल केलेल्या जनावरांचे सात टन मांस आढळून आले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे सदर मांस सहा लाख रुपये किमतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.ट्रकमधील मांस व ट्रक असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १०९, २७९, ४२९, सहकलम ९ महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात कोंढाळीचे ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक बांबुलकर यांनी बजावली. तपास उपनिरीक्षक बांबुलकर करीत आहेत. (वार्ताहर)