विदर्भात कोरोनाबाधिताचे सात हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:32+5:302021-02-06T04:12:32+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : विदर्भात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधिताच्या मृत्यूने चिंता वाढविली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून मृत्यूच्या प्रमाणात ...

Seven thousand deaths due to corona in Vidarbha | विदर्भात कोरोनाबाधिताचे सात हजार मृत्यू

विदर्भात कोरोनाबाधिताचे सात हजार मृत्यू

सुमेध वाघमारे

नागपूर : विदर्भात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधिताच्या मृत्यूने चिंता वाढविली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली. कोरोनाच्या या ११ महिन्याच्या काळात बुधवारी मृत्यूचा सात हजाराचा टप्पा ओलांडला. पहिले १००० मृत्यू १४५ दिवसात झाले. सप्टेंबर महिन्यात २९ दिवसात २००० मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसात ३४ रुग्णांचे मृत्यू झाले. सर्वाधिक बळी नागपूर जिल्ह्यात तर सर्वात कमी वाशिम जिल्ह्यात झाले.

विदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात ११, मे महिन्यात ५५, जून महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९, ऑगस्ट महिन्यात १२०२, सप्टेंबर महिन्यात २,४२८, ऑक्टोबर महिन्यात १४९२, नोव्हेंबर महिन्यात ५३५, डिसेंबर महिन्यात ५१६, जानेवारी महिन्यात ४०९ तर ३ फेब्रुवारीपर्यंत ३४ मृत्यू झाले. एकूणच विदर्भात बुधवारपर्यंत २,७४,८११ रुग्ण व ७,००२ मृत्यू नोंदविण्यात आले आहे. रुग्णसख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५४ टक्के आहे. सर्वाधिक मृत्यू ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत.

- पहिले १००० मृत्यू गाठायला लागले होते १४५ दिवस

विदर्भात पहिले १००० मृत्यू गाठायला १४५ दिवस लागले. त्यानंतर १८ दिवसातच, ७ सप्टेंबर रोजी १००० मृत्यूची नोंद होऊन मृत्यूची संख्या २००० झाली. याच महिन्यात १८ सप्टेंबर रोजी केवळ ११ दिवसातच १००० मृत्यूचा टप्पा ओलांडत मृत्यूची संख्या ३००० वर गेली. १३ दिवसांनी १००० मृत्यूची भर पडत १ ऑक्टोबर रोजी ४००० मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २३ दिवसांनी १००० मृत्यूने २४ ऑक्टोबर रोजी ५००० मृत्यूचा टप्पा ओलांडला. ३६ दिवसांनी १००० मृत्यू झाल्याने २९ नोव्हेंबर रोजी ६००० तर ६६ दिवसांनी १००० मृत्यूची नोंद झाल्याने ३ फेब्रुवारी रोजी ७००० मृत्यू झाले.

- जिल्हानिहाय रुग्ण मृत्यूची संख्या (३ फेब्रुवारीपर्यंत)

जिल्हा रुग्ण मृत्यू

नागपूर १३४९२७ ४१७८

भंडारा १३२५३ ३२२

वर्धा १०१६१ ३०९

गोंदिया १४२०९ १८२

चंद्रपूर २३०९५ ३९२

गडचिरोली ९३७५ १०५

अकोला ११६८७ ३३८

अमरावती २२२७६ ४२२

यवतमाळ १४५३९ ४२९

बुलडाणा १४११३ १७०

वाशिम ७१७६ १५५

- विदर्भाने असा गाठला हजार मृत्यूचा टप्पा

तारीख मृत्यू दिवस

२८ मार्च १ ००

२० ऑगस्ट १००० १४५

०७ सप्टेंबर २००० १८

१८ सप्टेंबर ३००० ११

१ ऑक्टोबर ४००० १३

२४ ऑक्टोबर ५००० २३

२९ नोव्हेंबर ६००० ३६

०२ फेब्रुवारी ७००० ६६

Web Title: Seven thousand deaths due to corona in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.