शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळली आईच्या कानातली इअररिंग; डॉक्टरांनी केली प्रयत्नांची शर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 21:11 IST

Nagpur News सात महिन्यांच्या बाळाने आईच्या कानातली रिंग गिळून टाकली. हे लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सगळे कौशल्य पणाला लावून ती रिंग विनाशस्त्रक्रिया बाहेर काढली व बाळाचे प्राण वाचवले.

ठळक मुद्देविनाशस्त्रक्रिया रिंग काढून मुलाला मिळाले जीवनदान

नागपूर : सात महिन्यांच्या चिमुकल्याने आईची इअररिंग गिळली. ती अन्ननलिकेत जाऊन रुतून  बसली. रिंगचे दोन्ही भाग टोकदार व त्यातच एवढ्या कमी वयाचे बाळ असल्याने ते काढणे सोपे नव्हते. रिंग काढताना अन्ननलिका फाटून बाळाच्या जिवाला धोका होण्याचीही शक्यता अधिक होती. परंतु, मेयोच्या ईएनटी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांनी आपले अनुभव व कौशल्य पणाला लावत, विनाशस्त्रक्रिया पोटातून रिंग बाहेर काढली, चिमुकल्याला जीवनदान मिळाले.

पाचपावली येथे राहणारा सात महिन्यांचा मितांश उमाटे असे चिमुकल्याचे नाव. शुक्रवारी मध्यरात्री मितांशला झोपविण्यासाठी आईने त्याला कडेवर घेतले. मितांश आईच्या कानातील रिंगशी खेळत होता. काही कळण्याच्या आत त्याने ती तोंडाने आढून गिळली. थोड्या वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो रडू लागला. काय झाले असावे, या चिंतेत आई-वडील असताना कानाची इअररिंग गायब असल्याचे लक्षात आले. त्याला दूध, पाणी पाजून पाहिले; पण मुलाचे रडणे कमी होत नव्हते. पहाटेचे तीन वाजले होते. मितांशच्या आई-वडिलांनी त्याच स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) गाठले. त्यावेळी कार्यरत डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढून खात्री करून घेतली. बदकाच्या आकाराची इअररिंग अन्ननलिकेत जाऊन फसली होती. याची माहिती डॉ. चंदनखेडे यांना दिली.

इअररिंग अन्ननलिकेच्या पहिल्या भागात होती

‘लोकमत’शी बोलताना डॉ. चंदनखेडे म्हणाले, सात महिन्यांचा बाळ, त्यात बदकाच्या आकाराची रिंग अन्ननलिकेच्या पहिल्या भागात फसली होती. रिंगचे दोन्ही भाग टोकदार होते. रिंग काढताना अन्ननलिका फाटण्याची भीती होती किंवा ती श्वासनलिकेत जाऊन जिवाला धोका होण्याची शक्यता होती. याची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली. त्यांच्या परवानगीने ‘इसोफेगोस्कोपी’ने रिंग काढण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकरणातील मागील अनुभव, कौशल्य व सहयोगी डॉक्टरांच्या मदतीने कुठेही इजा होऊ न देता रिंग बाहेर काढण्यात यश आले. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल.

- या डॉक्टरांचे मिळाले सहकार्य

ही शस्त्रक्रिया ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या मार्गदर्शनात डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांच्या नेतृत्वात सहयोगी प्राध्यापक डॉ. विपीनराम ईखार, बधिरीकरण विभागाच्या डॉ. शीतल दलाल यांनी यशस्वी केली.

दुर्मीळ प्रकरण

साधारण एक ते दोन किंवा त्यापुढील वयोगटातील मुलांमध्ये नाणे किंवा इतर वस्तू गिळणे ही सामान्य बाब आहे. परंतु, सात महिन्यांच्या चिमुकल्याने इअररिंगसारखी तीक्ष्ण वस्तू गिळणे आणि ती अन्ननलिकेत जाऊन फसणे हे धोकादायक ठरते. त्यात कुठलीही दुखापत न होता ती बाहेर काढल्याने हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात मोडते.

-डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे, सहायक प्राध्यापक ईएनटी विभाग मेयो

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके