शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:46 IST

जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

ठळक मुद्देशाळेत दिला शिक्षकांना चकमा : प्रशासनाची तारांबळ, तब्बल २४ तासानंतर पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.जरीपटक्यातील पाटणकर चौकात शासकीय मुलांचे निरीक्षणगृह आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या बालगुन्हेगारांना तसेच घरून निघून आलेल्या आणि कोणताही आधार नसलेल्या, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना येथे ठेवले जाते. त्यांच्या जेवण, निवास आणि शिक्षणाचा खर्च शासनाच्या निधीतून केला जातो. अशाचपैकी येथे असलेल्या शाळकरी मुलांपैकी बेनामी संजुपाल यादव, कार्तिक दिलीप भास्कर (१७), शहिद बलबीर नाडे (वय १७), प्रशांत प्रल्हाद नेवारे (वय १७), राजाराम भालचंद्र उईके (वय १६), मोहम्मद नियाज हुसेन चिस्ती (वय १५) आणि परमेश्वर बाबूराव ढगे (वय १४) ही मुले शनिवारी सकाळी निरीक्षणगृहातून शाळेत जायला निघाले. ती सर्व कामठी मार्गावरील शेंडेनगरात असलेल्या समता विद्यालयात शिकतात. शाळेत पोहोचल्यानंतर ९ ते ९.३० या वेळेत शिक्षकांची नजर चुकवून ती मुले शाळेतून पळून गेली. ही बाब लक्षात आल्याने शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली. इकडे-तिकडे विचारणा केल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी निरीक्षणगृह प्रशासनाला त्याची माहिती कळविली. बराच वेळ विचारविमर्श केल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाने जरीपटका पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी शाळा गाठून चौकशी केली. त्यानंतर या मुलांना शोधण्यासाठी शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर मुले हाती लागली नाही.अक्षम्य हलगर्जीपणाजरीपटक्यातील या निरीक्षणगृहाचे प्रशासन नेहमीच हलगर्जीपणासाठी चर्चेला येते. येथून यापूर्वीही अनेक मुले पळाली आहेत. वर्षभरात अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे. दरम्यान, या घटनेची लेखी तक्रार नम्रता राजू चौधरी (वय ५२) यांनी निरीक्षणगृह प्रशासनातर्फे तब्बल २४ तासानंतर जरीपटका ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मिश्रा यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पळून गेलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर