बुटीबोरीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:01+5:302021-04-18T04:08:01+5:30
बुटीबोरी : बुटीबोरी व औद्योगिक परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी दवाखान्यात बेड शिल्लक नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणा ...

बुटीबोरीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा
बुटीबोरी : बुटीबोरी व औद्योगिक परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी दवाखान्यात बेड शिल्लक नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणा रुग्णांना योग्य सुविधा पुरविण्यात फेल ठरली आहे. त्यामुळे बुटीबोरी येथे तातडीने १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा, अशी विनंती बुटीबोरी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना केली आहे. बुटीबोरी व औद्योगिक परिसरातील कोविडच स्थिती व शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधा बघता शुक्रवारी बुटीबोरी पोलीस स्टेशनद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांशी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानुसार येथील खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर औैषधोपचार करण्यासाठी नातेवाइकांना घरपोच सेवा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मुजीब पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अहमदबाबू शेख, भाजप गटनेता आकाश वानखेडे, पाणीपुरवठा समितीचे सभापती मंदार वानखेडे, राजू गावंडे, प्रदीप चंदेल, अमजद शेख, युसूफ शेख, सुनील किटे, नगरसेवक बबलू सरफराज, सनी चव्हाण, मनोज ढोके, प्रदीप चंदेल, तुषार डेरकर, डॉ.रमण चौधरी, डॉ. माया देवतळे, डॉ. सुधीर नागदेवते, डॉ. रचना कश्यप, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के आदी याप्रसंगी उपस्थित होते.