सत्र न्यायालय : नागपूर मिक्की बक्षीला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:17 IST2020-07-23T20:15:58+5:302020-07-23T20:17:33+5:30
मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी व्यावसायिक ऋषी खोसला (४८) खून प्रकरणातील आरोपी मिक्की ऊर्फ रुपिंदर बलवीरसिंग बक्षी (५५) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

सत्र न्यायालय : नागपूर मिक्की बक्षीला जामीन नाकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी व्यावसायिक ऋषी खोसला (४८) खून प्रकरणातील आरोपी मिक्की ऊर्फ रुपिंदर बलवीरसिंग बक्षी (५५) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला.
मिक्की युथ फोर्स सेक्युरिटी सर्व्हिसेसचा व्यवस्थापकीय संचालक होता. ही घटना ऑगस्ट-२०१९ मध्ये नेल्सन चौकाजवळ घडली होती. मिक्कीने खोसलाचा खून करण्याची सुपारी दिली होती. त्यानुसार भाडोत्री मारेकऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने खोसलावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर मारेकरी लगेच पळून गेले. त्यानंतर सदर पोलिसांनी खोसलाचा लहान भाऊ मनीष यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. तसेच, मिक्कीला अटक केली. न्यायालयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.