शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 01:47 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे थाटात वितरण

नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते विश्वासाचे असून, या श्रद्धेला तडा जाऊ नये. डॉक्टरांनी पैसे कमविणे यात गैर काहीच नाही. असे करीत असताना त्यांनी सामाजिक भान जपत समाजातील गरीब रुग्णांनादेखील मदत केली पाहिजे, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे सोमवारी नागपुरात थाटात वितरण झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘मेडिसीन’ आणि ‘हेल्थकेअर’ क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे झालेल्या समारंभाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य आॅर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्टÑचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ‘एसबीएस बायोटेक’, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा उपस्थित होते. व्यासपीठावर ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळतात. परंतु गरिबांच्या सेवेतून मिळणारी आत्मिक शांती हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. डॉक्टरांनी ग्रामीण भागाचीदेखील चिंता केली पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून डॉक्टरांनी संकल्प घ्यावा व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत एक नवा इतिहास रचावा, असेही राज्यपाल म्हणाले.दर्डा हे खरोखर ‘विजयस्तंभ’च- यावेळी राज्यपालांनी विजय दर्डा यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले. विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. त्यांनी सर्वच क्षेत्रात जीवाभावाची माणसे जोडली आहेत. त्यांचा करिष्मा सगळीकडेच दिसून येतो. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातदेखील ‘लोकमत’च दिसून येतो.- खरोखर दर्डा हे ‘विजयस्तंभ’च आहेत. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून, त्यांचा शब्द माझ्यासाठी जणू आदेशच असतो. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेले ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’ नवा इतिहास रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरकारी इस्पितळांची योग्य देखभाल व्हावी : दर्डायावेळी विजय दर्डा यांनी पुरस्कारांमागची भूमिका मांडली. मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहराला हे स्थान मिळवून देण्यात येथील डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे व त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, या भावनेतून पुरस्कारांची कल्पना समोर आली. सरकारी इस्पितळांची अवस्था वाईट असून, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम काढून इतर संस्थेला दिले पाहिजे. यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावे, असेही दर्डा म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीLokmatलोकमत