ग्रीन बस प्रवाशांच्या सेवेत
By Admin | Updated: November 18, 2014 00:50 IST2014-11-18T00:50:56+5:302014-11-18T00:50:56+5:30
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिझेलला पर्याय व पर्यावरणपूरक अशा इथेनॉलवर धावणारी ग्रीन बस सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झ्राली. संविधान चौक (रिझर्व्ह बँक चौक) येथे आयोजित

ग्रीन बस प्रवाशांच्या सेवेत
महापौरांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिझेलला पर्याय व पर्यावरणपूरक अशा इथेनॉलवर धावणारी ग्रीन बस सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झ्राली. संविधान चौक (रिझर्व्ह बँक चौक) येथे आयोजित कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांनी फित कापून व हिरवी झेंडी दाखवून पहिल्या फेरीसाठी ही बस रवाना केली; यासोबतच शहर बससेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, या हेतूने स्कॅनिया कंपनीच्या सहकार्याने दोन महिन्यापूर्वी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन बस उपलब्ध झाली होती. परंतु नियमानुसार प्रवासी वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन खात्यासह अन्य विभागाच्या परवानगी असल्याने ही बस प्रवाशांच्या सेवेत आली नव्हती. सर्वप्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्याने आता ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
ही बस सुरू होताच उपस्थितांनी आनंद व्यक्त क रून शहराचे पर्यावरण राखण्याला मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी मनपाच्या परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवीद्र्र भोयर, आरोग्य सभापती रमेश सिंगारे, गांधीबाग झोनचे सभापती रमेश पुणेकर, बसपाचे पक्षनेते मुरलीधर मेश्राम, नगरसेवक सतीश होले, शरद बांते, मनीषा कोठे, सारिका नांदूरकर, प्रकाश तोतवानी, परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संजय काकडे, स्कॅनिया कंपनीचे विश्वजित कुमार, चंद्रभान उदास, परिवहन विभागाचे वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, विजय चौरसिया, ग्रीन व्हिजल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.
पहिला आठवडा ही बस प्रायोगिक तत्त्वावर धावणार आहे. एम.एच.३१-डी.एस.६३३७ क्रमांकाची ही वातानुकूलित ग्रीन बस संविधान चौक ते खापरीदरम्यान दोन पाळ्यात धावणार आहे. ही बस सकाळी ८ व दुपारी ६ अशा १४ फेऱ्या दररोज करणार आहे. या बसला १० थांबे राहतील. यात संविधान चौक, व्हेरायटी चौक, पंचशील चौक, रहाटे कॉलनी, छत्रपती चौक, सोमलवाडा, विमानतळ ,चिंचभवन व खापरी आदींचा समावेश आहे.
बसचे भाडे पहिल्या २ ते ४ कि.मी.अंतरासाठी १० रुपये, (लहान मुलांसाठी ५ रुपये),६ कि.मी.ला ११, ८ कि.मी.साठी १३ रुपये, १० कि.मी.साठी १५ रुपये, १२ कि.मी.साठी १८ कि.मी.ला २१ तर १६ कि.मी. अंतरासाठी २५ रुपये (लहान मुलांना १३ रुपये) या प्रमाणे राहणार आहे. (प्रतिनिधी)