शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल : विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:49 IST

राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.

ठळक मुद्देआरोपी वाहनचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.पृथ्वीराज मनोहर जाधव (वय २१, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, रघुजीनगर) आणि सुशांत सुभाष नागदेवते (वय २५, रा. आदिवासी कॉलनी) तसेच शुभम गुणवंतराव वाघ (वय २०, रा. आदिवासी कॉलनी) हे तीन मित्र रविवारी रामटेकला गेले होते. तेथील मित्रांसोबत गडमंदिर दर्शन आणि दिवसभर गंमतजंमत केल्यानंतर रात्री त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने रामटेकवरून नागपुरात परत येत होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर मार्गावरील शेंद्रे ढाब्यासमोर चुकीच्या दिशेने वेगात जेसीबी (एमएच ३४/ एल ६६७९) चालविणाऱ्या आरोपी शाहू याने सुशांतच्या हॉरनेट स्पोर्ट बाईक (एमएच ४९/एएक्स ३२९५)ला जोरदार धडक मारली. त्यामुळे स्पोर्ट बाईक चक्काचूर झाली आणि पृथ्वीराज तसेच सुशांतचा करुण अंत झाला तर शुभम गंभीर जखमी झाला होता. या अपघात प्रकरणात कळमना पोलिसांनी शिवराज रणजित जाधव (वय २४, रा. वकीलपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जेसीबी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आरोपीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. जेसीबीसारखे अवजड वाहन आरोपी शाहू राँग साईड (चुकीच्या बाजूने) चालवित होता. त्यात अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात तो जेसीबी चालवित होता. त्याच्या निष्काळजीपणामुळेच दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी कळमना पोलिसांना आरोपी शाहूविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कळमना पोलिसांनी आरोपी शाहूविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ तसेच ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.यापुढे असेच होणारनिष्काळजीपणे वाहन चालवून निर्दोष व्यक्तीचा बळी घेणारे वाहनचालक सुसाट वेगाने पळून जातात. पोलिसांच्या हाती लागले तरी अपघाताच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे बेदरकार वाहनचालक निर्ढावतात. त्यांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यामुळे तो वारंवार अपघात घडवतो. या घडामोडीमुळे मात्र बेदरकार वाहनचालकांवर अंकुश बसण्याची आशा निर्माण झाली आहे. यापुढे राँग साईड वाहन चालवून कुणाचा बळी घेणाऱ्या आरोपी वाहनचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यात आरोपीला तातडीने जामीनही मिळत नाही.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयAccidentअपघात