रामझुल्यासाठी सप्टेंबरचा मुहूर्त
By Admin | Updated: July 1, 2014 01:00 IST2014-07-01T01:00:17+5:302014-07-01T01:00:17+5:30
नागपुरातील रेल्वे स्थानकाजवळील रामझुला वाहतुकीसाठी एप्रिल महिन्यात सुरू होईल ही पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणा फोल ठरली आहे. अधिकाऱ्यांनी आता या पुलासाठी

रामझुल्यासाठी सप्टेंबरचा मुहूर्त
नागपूर : नागपुरातील रेल्वे स्थानकाजवळील रामझुला वाहतुकीसाठी एप्रिल महिन्यात सुरू होईल ही पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणा फोल ठरली आहे. अधिकाऱ्यांनी आता या पुलासाठी सप्टेंबरचा मुहूर्त दिला आहे. या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने हा नवीन मुहुर्तही बारगळण्याची शक्यता अधिक आहे.
पालकमंत्र्यांनी आज रामझुला बांधकामाचा आढावा घेतला. बांधकामाला होणाऱ्या विलंबाची कारणे अधिकाऱ्यांकडून समजून घेतली आणि शिल्लक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
अधिकाऱ्यांनी मोघे यांना दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या स्लबमध्ये तांत्रिक अडचण आल्याने दोन महिने काम थांबले होते. पुलाच्या एका बाजूने दोन स्लॅब टाकण्यात आले असून सदरकडे जाणाऱ्या भागाकडे तीन स्लॅब टाकण्यात येणार आहे. हे काम अद्याप शिल्लक आहे. हे संपूर्ण काम सप्टेबंरपर्यंत चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करून त्याचे उद््घाटन व्हावे, अशी इच्छा मोघे यांनी बैठकीत बोलून दाखविली. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही बाब शक्य नाही. सप्टेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये उपस्थित होते.
मातंग समाज भवन
मातंग समाजभवनाचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात त्याचे उद््घाटन होण्याची शक्यता आहे. नागपूर सुधार प्रन्यासशी संबंधित प्रकल्पांबाबत मोघे यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. वर्धा मार्गावर हे भवन बांधण्यात आले असून त्यावर ४ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)