परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विलगीकरणाची व्यवस्था()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:52+5:302020-12-25T04:08:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विमानतळावर येणारे प्रवाशांपैकी ज्यांनी मागील ४ आठवड्यात परदेश प्रवास केला आहे, अशा ...

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विलगीकरणाची व्यवस्था()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विमानतळावर येणारे प्रवाशांपैकी ज्यांनी मागील ४ आठवड्यात परदेश प्रवास केला आहे, अशा प्रवाशांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये व व्हीएनआयटी येथे विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी विमानतळावर जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, संजय निपाणे, पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चिलकर, मिहान विमानतळाचे संचालक आबीद रुही, टर्मिनल मॅनेजर अमित कासटवार आदी उपस्थित होते.
विमानाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर तपासणीची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कशाप्रकारे करण्यात येते, त्यावर नियंत्रण कसे आहे, याबाबतचा आयुक्तांनी आढावा घेतला. प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये व व्हीएनआयटी येथे विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. या दोन्ही व्यवस्थेचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. विलगीकरणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरून दोन बसेसची व्यवस्था प्रशासनाने केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.