शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची शिक्षा सुनावली, पण १७ क्रूरकर्म्यांना कधी लटकावणार? सर्व कैदी नागपुरात, एकाची दया याचिकाही फेटाळली गेली

By नरेश डोंगरे | Updated: May 19, 2024 14:25 IST

मुंबई बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमन याला नऊ वर्षांपूर्वी अर्थात ३० जुलै २०१५ रोजी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

नागपूर : अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांतील  सामूहिक हत्याकांडाचे निकाल आठ दिवसांत लागले. दोन प्रकरणांतील नराधमांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर दोन वर्षांत नागपुरातील दोन क्रूरकर्म्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एकूण १७ फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी ? हा प्रश्न  चर्चेला आला आहे.

शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावलेल्या अकोला जिल्ह्यातील आरोपींची नावे हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) अशी असून, ते अकोटमधील आहेत.

तिहेरी हत्याकांड प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील किशोर शेंडे (४२) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली आहे.

फाशी यार्डात तिघांची भर पडणारराज्यात फाशी देण्याची व्यवस्था असलेले दोनच कारागृह आहेत. एक पुण्याचा येरवडा, तर दुसरा नागपूरचा मध्यवर्ती कारागृह. नागपूरच्या कारागृहातील यार्डात सध्या फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले १४ आरोपी आहेत. अकोल्यातील  आरोपींनाही येथे आणले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंमलबजावणी नऊ वर्षांपूर्वीमुंबई बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमन याला नऊ वर्षांपूर्वी अर्थात ३० जुलै २०१५ रोजी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरjailतुरुंग