आॅनलाईन लोकमतनागपूर : केवळ बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीचे प्रकरण पुढे आल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे. मुलगी बेपत्ता असून या मुलीची खरेदी करणाऱ्या एका दाम्पत्याला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दाम्पत्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. ए. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ८ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.मनीष सूरजरतन मुंदडा (३६) त्याची पत्नी हर्षा सूरजरतन मुंदडा (३२) रा. सेनापतीनगर दिघोरी, अशी आरोपींची नावे आहे.प्रकरण असे की, वैभवनगर वाडी येथे राहणाऱ्या मोना अविनाश बारसागडे (२६) नावाच्या महिलेला काही दिवसांपूर्वी लॉ कॉलेज चौकातील एका इस्पितळात भारती नावाची एक महिला भेटली होती. या महिलेने मोनाचे चेकअप करून तिची या दोन्ही आरोपींसोबत भेट घालून दिली होती. पुढे ३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक आॅफ इंडियासमोर या दाम्पत्याने मोनासोबत मुलीचा पाच लाखात सौदा करून काही पैसे तिला दिले होते आणि मुलगी घेऊन गेले होते. ही मुलगी आरोपी दाम्पत्याने अन्य कुणाला तरी विकली असून ती पुणे येथे असल्याचे पोलिसांना समजले आहे. मोनाने आपली मुलगी परत मागितली असता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलगी परत करण्यास नकार दिला.मोना बारसागडे हिने ५ डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकाराबाबत धंतोली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी बुधवारी पहाटे भादंविच्या ३७०, ५०६, ३४ आणि बाल न्याय कायद्याच्या ८१ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला ताबडतोब अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. यादव यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाने भारती नावाच्या महिलेला अटक करण्याचे आणि बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे कारण सांगून आरोपी दाम्पत्याची १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळण्याची वनंती केली.न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील मैथिली काळवीट तर आरोपींच्या वतीने अॅड. मंगेश मून यांनी काम पाहिले.
नागपुरात बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:25 IST
केवळ बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीचे प्रकरण पुढे आल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे.
नागपुरात बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीने खळबळ
ठळक मुद्देआरोपी दाम्पत्याला अटक : तीन दिवसांचा पीसीआरमुलगी बेपत्ताच : दुसऱ्यांदा विक्री, पुणे येथे असण्याची शक्यता