शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन

By जितेंद्र ढवळे | Updated: January 29, 2025 15:12 IST

Nagpur : बापू शिक्षण संस्थेची स्थापना केली

नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत ऍड. मा. म. गडकरी यांचे बुधवार दि. २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता वृद्धापकाळाने दाभा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. उद्या गुरुवार दि. ३० रोजी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ऍड. गडकरी यांचे पार्थिव आज दुपारी ४ पासून जुने गुरुकुल, २६८, शासकीय प्रेस कर्मचारी वसाहत दाभा, नागपूर इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९.३० वाजता इथूनच अंत्ययात्रा निघणार आहे. गडकरी यांच्या मागे पत्नी सुधाताई, पुत्र ऍड. वंदन गडकरी, तीन मुली आरती, अर्चना आणि महाराष्ट्र वित्त सेवेतील निवृत्त संचालक भारती झाडे व  जावई ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

ऍड. गडकरींचा अल्प परिचय -ऍड. मा. म. गडकरी यांचा जन्म २६ एप्रिल १९३३ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या हिवरा या गावात झाला. त्यांचे शिक्षण एम. ए., बी. एड., एल.एल.बी. झाले होते. ते १० मार्च २००८ पासून तब्बल आठ वर्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञ मंडळाचे ते दीर्घकालीन अध्यक्ष होते. त्यांनी बापू शिक्षण संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना नई तालीमच्या दृष्टीने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सर्व सेवा संघाचे ते  मंत्री  व  विश्वस्त होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी मार्फत तत्व प्रचारक म्हणून त्यांनी तेरा वर्षे कार्य केले. स्वावलंबी विद्यालय वर्धा व श्रीकृष्ण हायस्कूल कान्होलीबारा येथे त्यांनी शिक्षक म्हणून आठ वर्षे कार्य केले. गांधीजींच्या कार्याने प्रेरित होऊन आठ वर्षे त्यांनी वर्धा शहरात भंगी काम केले.  २३ वर्ष त्यांनी वकिली केली. उच्च न्यायालयाचे ते सरकारी वकील होते. कायदे सल्लागार नागपूर जिल्हा परिषद नागपूरचे त्यांनी सात वर्षे कार्य केले. लॉ कॉलेज नागपूर येथे अल्पकालीन अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सहा वर्षे सेवा दिली. उमरेडच्या जीवन शिक्षण मंडळाचे ते संस्थापक होते. गुरुदेव सेवा मंडळ, काँग्रेस सेवा दल, राष्ट्रसेवादल, भूदान आंदोलनात त्यांनी कार्य केले. त्यांनी विविध राष्ट्रीय प्रांतिक व स्थानिक शिबिरात सहभाग घेतला व आयोजन केले. आचार्य विनोबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जयप्रकाश नारायण, कर्मयोगी बाबा आमटे, आचार्य दादा धर्माधिकारी, आर. के. पाटील, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, यदुनाथ थत्ते, ना. ग. गोरे, रवींद्र वर्मा, बाळासाहेब भारदे, प्राचार्य ठाकूरदासजी बंग, वल्लभ स्वामीजी, डॉ. एस. एन. सुब्बाराव आदिशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या सहवासात ते अनेक वर्ष राहिले. ते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. स्वतःसह कुटुंबातील अनेकांचे त्यांनी आंतर जातीय विवाह केलेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर