जलसमृद्धी आणण्यासाठी जिल्हा परिषदेत चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:33+5:302021-07-19T04:06:33+5:30
नागपूर : भूजल साक्षरता अभियानाचा भाग म्हणून जिल्ह्यातील जलस्रोत आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात चर्चासत्र ...

जलसमृद्धी आणण्यासाठी जिल्हा परिषदेत चर्चासत्र
नागपूर : भूजल साक्षरता अभियानाचा भाग म्हणून जिल्ह्यातील जलस्रोत आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात चर्चासत्र पार पडले़ यामध्ये जिल्ह्यात जलसमृद्धी आणण्याविषयी विचारमंथन झाले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रश्मी बर्वे, शिक्षण सभापती भारती पाटील, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, अतिरिक्त सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ़ संजीव हेमके व यांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांची उपस्थिती होती़ भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अशा प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन राज्यभरात होत आहे़ दरम्यान, उपअभियंता नीलेश मानकर यांनी भूजल साक्षरतेचे महत्त्व व पाणी वाचवून जलसमृद्धी आणण्यासाठीच्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या़ दरम्यान, कळमेश्वर तालुक्यातील घोराडाचे सरपंच मंगेश गोतमारे यांनी गाव पाणीदार करण्याविषयीचा अनुभव सांगितला़