शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

नागपूरच्या झिरो माईलला बनविणार ‘सेल्फी पॉर्इंट’ : जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:40 IST

शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, एमटीडीसीचे प्रधान सचिव नितीन गद्रे, व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते बोदलकसा पर्यटन प्रकल्प, वणी येथील माईन टुरिझमचे लोकार्पण करण्यात आले. मदन येरावार म्हणाले, देशात व विदेशातही अनेक राज्यांनी पर्यटनाच्या आधारे आपली अर्थव्यवस्था समृद्ध केली आहे. पर्यटनात आर्थिक चित्र बदलण्याची क्षमता आहे. एमटीडीसीचे विश्रामगृह हे पर्यटकांची पहिली पसंती असावी, असा आमचा प्रयत्न आहे. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा उपक्रम अभिनंदनीय आहे. यासाठी नागपूर मनपातर्फे आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू. प्रास्ताविक डॉ. उदय बोधनकर, सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानची ओळख ज्योत्स्ना पंडित तर संचालन वृशाली देशपांडे यांनी केले. उद्घाटनानंतर सुरमयी शाम या गायक सावनी रवींद्र आणि कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंगनागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंग केले. येथील संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासोबतच पर्यटनाला वाव मिळावा म्हणून आम्ही हा फेस्टिव्हल आयोजित केला होता. तो प्रचंड यशस्वी झाला. त्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या  काळात आपल्याला दिसतील, असा विश्वासही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर