विदर्भ क्रीडा मंडळाच्या संघाची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:21+5:302021-02-06T04:13:21+5:30
काटाेल : न्यू दिल्ली रचना सायन्स सेंटर फरिदाबाद व एस. जी. टी. विद्यापीठ गुरुग्राम यांच्या संयुक्त विद्यामाने १७ जानेवारी ...

विदर्भ क्रीडा मंडळाच्या संघाची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड
काटाेल : न्यू दिल्ली रचना सायन्स सेंटर फरिदाबाद व एस. जी. टी. विद्यापीठ गुरुग्राम यांच्या संयुक्त विद्यामाने १७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या काळात राष्ट्रीय खाे-खाे शिबिराचे आयाेजन केले आहे. या शिबिरासाठी काटाेल येथील विदर्भ क्रीडा मंडळाच्या खाे-खाे संघाची निवड करण्यात आली.
विदर्भ क्रीडा मंडळाच्या संघाने राईज स्पाेर्ट्स एक्सलन्ससाठी राष्ट्रीयस्तरावर १० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. खाे-खाे फेडरेशन ऑफ इंडिया व अल्टिमेट खाे-खाे द्वारे देशातील १३८ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यात काटाेल येथील विदर्भ क्रीडा मंडळाच्या दिलराज रेखा सेंगर या खेळाडूचा समावेश आहे. ते सध्या वनविभागात कार्यरत असून, त्यांची निवड बेमेतारा (छत्तीसगड) येथे पार पडलेल्या ५३ व्या राष्ट्रीय स्पर्धेमधून करण्यात आली. यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये पार पडलेल्या भोपाळ (मध्य प्रदेश) येथील साफ गेम्समध्ये रेस्ट ऑफ इंडिया गुवाहाटी, एशिएन चॅम्पियनशिपसाठी राजस्थान, २०१७ मध्ये पार पडलेल्या भारत-इंग्लंड खाे-खाे सिरीजमधील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.