नागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात राज्यातून एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून यात नागपूर विभागातील सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभाग १६, पुणे विभाग १२, लातुर विभाग ३, औरंगाबाद विभाग २, नाशिक विभाग २ व अमरावती विभाग २ असे एकूण ७५ विद्यार्थांची निवड झाली आहे, तर ३८ जणांची प्रतिक्षा यादीत निवड झाली आहे.
राज्यातून नागपूर विभागातील सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड परदेश शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३१, चंद्रपूर जिल्ह्यातील ६ तर वर्धा जिल्ह्यातील १ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाच्या वत्तीने लवकर या सर्व विद्यार्थाना स्कॉलरशीप लेटर दिले जाणार आहे.