शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस ड्राईव्हमध्ये १३३ विद्यार्थ्यांची निवड, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचा पुढाकार

By आनंद डेकाटे | Updated: April 19, 2023 16:46 IST

विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळाव्याचे आयोजन

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कॅम्पस इंटरव्यूमध्ये एकूण तब्बल १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हेक्सावेअर कंपनीत ४० तर तेली परफॉर्मन्स कंपनीत ९३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मिहान येथील हेक्सावेअर आणि टेलीपरफॉर्मन्स या दोन कंपनीकडून विद्यापीठ दीक्षांत सभागृहात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 

विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. विद्यार्थ्यांचा देखील या रोजगार मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.मिहान येथील हेक्सावेअर या कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व सीनियर एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्या. या कंपनीच्या मुलाखतीकरिता १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकच दिवस आयोजित या मुलाखतीत तब्बल ४० विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या कंपनीत निवड करण्यात आली. ४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाखांपासून ४ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

टेलीपरफॉर्मन्स या कंपनीकडून कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कस्टमर सर्विस असोसिएट्स ज्या पदाकरिता पहिल्या दिवशी १५० तर दुसऱ्या दिवशी ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुलाखतीनंतर पहिल्या दिवशी ६६ तर दुसऱ्या दिवशी २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १.८ ते ४ लाख रुपयांचे पॅकेज या पदाकरिता दिले जाणार आहे.

- कुलगुरू व प्र-कुलगुरूंची भेट

दीक्षांत सभागृह येथे सुरू असलेल्या कॅम्पस इंटरव्यूला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी भेट दिली. रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र -कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी