अत्याधुनिक विज्ञान संशोधन केंद्रासाठी गरोबा मैदान शाळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:29+5:302021-03-04T04:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका शाळेत शिकणाऱ्या प्रतिभाशाली गरीब विद्यार्थ्यांसाठी गरोबा मैदान येथील मनपा शाळेत अत्याधुनिक, उत्कृष्टस्तराच्या ...

अत्याधुनिक विज्ञान संशोधन केंद्रासाठी गरोबा मैदान शाळेची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका शाळेत शिकणाऱ्या प्रतिभाशाली गरीब विद्यार्थ्यांसाठी गरोबा मैदान येथील मनपा शाळेत अत्याधुनिक, उत्कृष्टस्तराच्या विज्ञान संशोधन केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
महापौर यांच्या कक्षात मनपा शाळेतील गरीब, प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान संशोधन केंद्राच्या स्थापनेबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण सभापती दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर व अपूर्व विज्ञान मेळा आयोजित करणारे सुरेश अग्रवाल उपस्थित होते.
मनपाच्या माध्यमाने दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमाने सुरेंद्रगड मनपा शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी रामेश्वरम् येथून लहान उपग्रह अंतरिक्षात सोडण्याच्या नासाच्या अभियानात भाग घेतला. त्यांच्यामुळे नागपूरला आंतरराष्ट्रीयस्तरावर लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांनी शिक्षण समिती सभापतींना मनपाची बंद शाळा शोधण्याची जबाबदारी दिली. जिथे विज्ञान संशोधन केंद्राची स्थापना केली जाऊ शकते. महापौरांच्या निर्देशाप्रमाणे गरोबा मैदान येथील शाळेची निवड करण्यात आली.
अपूर्व विज्ञान मेळाव्यासारख्या इथेही ‘आओ विज्ञान से दोस्ती करें’च्या धर्तीवर विज्ञानाचे शिक्षण दिले जाईल. तसेच शिक्षकांनासुद्धा प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सुरेश अग्रवाल यांनी सांगितले.